खाऊनिया तंबाखू मारीतो शान।
करितो इकडचा तिकडचा परिसर घाण।
सोडून दे तंबाखू होईल तुझा सन्मान।
ओढूनीया सिगारेट काढीतो धुर।
म्हणे माझ्यासारखा नाही कोणी शुर।
असेल तुमच्यात दम तर काढा नाकातुन धूर।
खाऊनीया गुटखा।
देतो मानेला झटका।
सोडून दे हा नाद लटका।
नाहीतर बसेल आरोग्याला फटका।
पेउनिया बिअर।
म्हणतो विस यु happy new year।
सोडून दे बिअर कशाला टाकतो आयुष्याचा reverse gear।
तुका म्हणे जो व्यसनी रंगला।
त्याचा संसार लवकरच भंगला।

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comment :